रिओ दी जानेरो : अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्सने आपल्या कारकीर्दीची अखेर सुवर्णपदकानं केली आहे. मायकल फेल्प्सने फोर बाय हंड्रेड मेडली रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.


 
मायकल फेल्प्सच्या कारकीर्दीत ऑलिम्पिकमधलं हे 28 वं पदक ठरलं आहे, त्यामध्ये 23 सुवर्णपदकांचा समावेश आहे. रिओ ऑलिम्पिकमधलं मायकल फेल्प्सचं हे पाचवं सुवर्णपदक आहे, तर एक रौप्यपदकही त्याने पटकावलं आहे.

अमेरिकेच्या संघानं तीन मिनिटं आणि 27.95 सेकंदाची वेळ नोंदवून नवा ऑलिम्पिक विक्रमही रचला. मायकल फेल्प्सचं ऑलिम्पिक कारकीर्दीतलं हे 23 वं सुवर्णपदक असून त्याच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये एकूण 28 पदकं जमा आहेत.