नवी दिल्लीः सॅमसंगचा Tizen ओएस ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या Z2 फोनचा ऑफिशिअल व्हिडिओ समोर आला आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. सॅमसंग हा फोन केवळ 4 हजार 499 रुपयांत लाँच करणार असल्याची माहिती आहे.   या स्मार्टफोनसाठी कंपनीने रिलायन्स जिओ इंटरनेटसोबत टाएप केल्याचीही माहिती आहे. ज्यामुळे युझर्सना स्वस्त किंमतीत 4G डाटा मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये फोनचे फीचर्सही समोर आले आहेत.   काय आहेत फीचर्स?  
  • 1.5GHz प्रोसेसर
  • 4.5 इंच स्क्रिन
  • 1 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोरेज
  • 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 1500mAh ते 2000mAh क्षमतेची बॅटरी
  पाहा व्हिडिओः