हेडलाईन्स


------------------------

1. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच,पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर पूंछमध्ये ग्रेनेड हल्ला, काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न

----------------

2.निवडणुकीआधी पाकला जशास तसं उत्तर देऊ म्हणणारे, आता कुठं गेले, काश्मीरच्या सर्वपक्षीय बैठकीवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात

--------------------

3. जी लोक दुरून मला खूप महान वाटत होती ती जवळ गेल्यावर खूप लहान वाटली, नागपुरात नितीन गडकरींचं शिक्षक शिबिरात वक्तव्य

------------------

4. सर्व टोलनाक्यांना पिवळ्या पट्ट्यांचा नियम लागू करण्याची मागणी,खारेगाव टोलनाक्यावर पिवळे पट्टे मारण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

------------------

5. टिटवाळ्यात खड्ड्यानं घेतला तरुणाचा बळी, खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात विजय केंद्रेचा मृत्यू, कामावरुन घरी परतताना काळाचा घाला

------------------

6. 14 दिवसानंतर महाड दुर्घटनेतील दुसऱ्या बसचाही सांगडा सापडला, पुलापासून 550 मीटरवर जयगड-मुंबई बसचे अवशेष, तवेरासाठी शोधकार्य सुरूच

-------------------

7. गिरणी कामगारांना मिळालेल्या घरांवर दलालांचा डोळा, उद्धव ठाकरेंचा घणाघात, ठाकरे-अत्रे वाद निरर्थक, उद्धव ठाकरेंचं मत

--------------------

8. लोणावळ्यातल्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची आणि परश्याचा समावेश, लवकरच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरचा पुतळा बसवणार

---------------------

9. ललिता बाबरची रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक, ऑलिम्पिकची फायनल गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट

---------------

10. विराट कोहलीच्या टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, तिसऱ्या कसोटीत विंडीजचा 237 धावांनी धुव्वा उडवून मालिकाही टाकली खिशात

------------------

एबीपी माझा वेब टीम