रिओ दी जेनेरिओ: भारताचा रोईंगपटू दत्तू भोकनळची रिओ ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्याची संधी अवघ्या सहा सेकंदांनी हुकली. उपांत्य फेरी गाठण्यासाठी दत्तूला उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या लढतीत टॉप थ्रीमध्ये स्थान मिळवणं गरजेचं होतं.

 

दत्तूनं 6 मिनिटं आणि 59.89 सेकंदांची वेळ नोंदवली. पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळं दत्तू पदकाच्या शर्यतीतून आऊट झाला. मात्र रोईंगमध्ये सात मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवणारा दत्तू तिसराच भारतीय ठरला आहे. याआधी बजरंग लाल आणि स्वर्ण सिंग यांनी ही कामगिरी बजावली होती.

 

दत्तूनं पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये 2 किलोमीटरचं अंतर 7 मिनिटं आणि 21.67 सेकंदांत पार करून तिसरं स्थान मिळवलं होतं.मूळचा नाशिकच्या चांदवडचा रहिवासी असलेला दत्तू 2012 पासून पुण्यात लष्कराच्या सेवेत आहे.