मुंबई: सोशल मीडियानंतर आता राजकीय क्षेत्रातूनही लेखिका शोभा डे यांच्या वादग्रस्त ट्विटचा समाचार घेतला जात आहे. 'आपला जो प्रांत नाही त्यावर बोलण्यापेक्षा ते कळतं त्यावरच बोलावं', असा सल्ला देत शोभा डे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


 

दुसरीकडे राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही शोभा डे यांच्या वादग्रस्त ट्विटचा निषेध केला आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण:

 

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली आहे. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला.

 


 

भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केला. त्यानंतर देशभरातल्या ट्विटराईट्सकडून शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे.