भोपाळ(मध्य प्रदेश): मुलांच्या हातात लॅपटॉप असायला हवा, त्या वयात शस्त्र हातात दिली आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील अशांततेच्या मुद्द्यावरुन खंत व्यक्त केली. काश्मीरमधील अशांततेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गंभीर विषय बनला आहे.


 

 

पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी '70 साल आझादी, याद करो कुर्बानी' कार्यक्रमाची सुरुवात केली. मोदींनी यावेळी बोलताना काश्मीरमधील भीषण वास्तव मांडलं. तसंच काश्मीरचा विकास करण्यासाठी केंद्र लागेल ती सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे, असंही सांगितलं.

 

 

समस्येचा मार्ग विकासाने शोधावा- मोदी

 

मोदींनी काश्मीर प्रश्नावर दुःख व्यक्त करताना कोणत्याही परिस्थितीत काश्मीरचा विकास करण्याचं सांगितलं. सरकार महेबूबा मुफ्ती यांचं असो की दुसऱ्या कोणाचं, पण समस्येचा मार्ग विकासातूनच शोधावा लागेल, असं सांगितलं. भारत ज्या प्रमाणे स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे, तसंच वातावरण काश्मीरमध्ये निर्माण करणार असल्याचं मोदींनी सांगितलं.