मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण यामध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचं नाव न दिसल्याने चाहत्यांना धक्काच बसला. धोनीला संघातून का वगळण्यात आलं याचं कारणही बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे.


निवडकर्त्यांना दुसऱ्या विकेटकीपरचा शोध असल्याचं कारण एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच या मालिकेत रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. मोठ्या काळानंतर धोनीला मुख्य मालिकेतून वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याचा समावेश नाही हे पाहून चाहते आणखी नाराज झाले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेत धोनीचा समावेश नसेल. कारण, आम्हाला दुसऱ्या विकेटकीपरचा शोध आहे. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना फलंदाजीचीही संधी मिळेल, असं एमएसके प्रसाद म्हणाले.

धोनीने भारताकडून सर्वाधिक टी-20 सामने खेळले आहेत. भारताने 2006 मध्ये आपला पहिला टी-20 सामना खेळल्यानंतर आतापर्यंत एकूण 104 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत, ज्यापैकी धोनीने 93 सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्त्वातच भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. टी-20 क्रिकेटमध्येही धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

विंडीजविरुद्धच्या दोन वन डेसाठी केदार जाधवचा समावेश

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वन डे साठी केदार जाधवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर केदार पुन्हा फिट झाला आहे. यानंतर त्याला दलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आलं होतं. त्याचा संघ फायनलमध्ये जाईल अशी अपेक्षा असल्यामुळे त्याचा तिसऱ्या वन डेत समावेश करण्यात आला नव्हता. पण तो चौथ्या आणि पाचव्या वन डे साठी संघासोबत असेल, असं निवडकर्त्यांनी सांगितलं.

विंडीजविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार),  शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. शिवाय शिखर धवनच्या जागी पुन्हा एकदा मुंबईकर खेळाडू पृथ्वी शॉचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर मुरली विजयनेही कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना - 21 नोव्हेंबर

दुसरा सामना - 23 नोव्हेंबर

तिसरा सामना - 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना - 6 डिसेंबर

दुसरा सामना - 14 डिसेंबर

तिसरा सामना - 26 डिसेंबर

चौथा सामना - 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना - 12 जानेवारी

दुसरा सामना - 15 जानेवारी

तिसरा सामना - 18 जानेवारी