नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी प्लंबरसह तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश यादव, राजू यादव, दीपक सोनी, आणि सलमान शाह अशी आरोपींची नावे आहेत.
दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत आशा आणि उषा पाठक या दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. धारदार शस्त्राने वार करुन दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव हा प्लंबिंग कामाच्या निमित्ताने या बहिणींच्या घरात आला होता. तेव्हा या दोन्ही घरात एकट्याच राहतात भरपूर पैसे आणि दागिने आहेत हे त्यांने न्याहाळलं आणि हा सगळा कट आखला. त्या दिवशी तो मुद्दाम काम पूर्ण न करता दुसऱ्या दिवशी येतो, असं सांगून गेला. दुसऱ्या दिवशी तो कामासाठी आला, त्याच्या पाठोपाठ त्याने इतर सहकाऱ्यांनाही इलेक्ट्रिशियन म्हणून बोलावलं. यानंतर या आरोपींनी त्यांची हत्या करून दरोडा टाकला. सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे.
आशा आणि उषा पाठक या दोघीही बहिणी अविवाहित होत्या. त्यांचं वय अंदाजे 70 ते 72 वर्षांच्या आसपास होतं. आनंदवन सोसायटीतील फ्लॅटमध्ये त्या दोघीच राहत होत्या. मयतांपैकी एक बहीण निवृत्त शिक्षिका होती, तर दुसरी ग्रंथपाल म्हणून कार्यरत होती.
दिल्लीतील मराठी बहिणींच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Oct 2018 08:10 AM (IST)
राजधानी नवी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी प्लंबरसह तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश यादव, राजू यादव, दीपक सोनी, आणि सलमान शाह अशी आरोपींची नावे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -