टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी धोनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
या दोन्ही मालिकांसाठीच्या भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. दोन्ही संघांत दिनेश कार्तिक पर्यायी यष्टिरक्षक असेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 4 नोव्हेंबरपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. 4 नोव्हेंबर (कोलकाता), 6 नोव्हेंबर (लखनौ), 11 नोव्हेंबर (चेन्नई) ला दोन संघांमध्ये सामने होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 21 नोव्हेंबरपासून टी20 सामने होतील. 21, 23 आणि 25 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियात हे सामने रंगणार आहेत.
झारखंडचा 29 वर्षीय डावखुरा स्पिनर शाहबाज नदीमचा संघात समावेश करण्यात आला आहे. कृणाल पांड्याने संघात आपलं स्थान टिकवलं आहे, तर दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिलेल्या वॉशिंग्टनने पुनरागमन केलं आहे.
दरम्यान, विंडीजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या वन डे सामन्यासाठी केदार जाधवचा भारतीय वन डे संघात समावेश करण्यात आला आहे.
विंडीजविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. शिवाय शिखर धवनच्या जागी पुन्हा एकदा मुंबईकर खेळाडू पृथ्वी शॉचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर मुरली विजयनेही कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार