गोलंदाज | संघ | सामने | विकेट्स |
रवीचंद्रन अश्विन | भारत | 227 | 564 |
जेम्स अँडरसन | इंग्लंड | 179 | 535 |
स्टुअर्ट ब्रॉड | इंग्लंड | 212 | 525 |
'या' भारतीय गोलंदाजाने दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2019 12:29 PM (IST)
एका भारतीय गोलंदाजाने गेल्या दोन वर्षांपासून एकही वन डे आणि टी-20 सामना न खेळता संपूर्ण दशकात सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा बहुमान मिळवला
getty Image
NEXT
PREV
मुंबई : भारताचा स्टार ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन याने गेल्या दोन वर्षांपासून एकही एकदिवसीय आणि एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तरीदेखील त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. अश्विनने या संपूर्ण दशकात (1 जानेवारी 2010 ते आतापर्यंत) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत.
मागील 10 वर्षांमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदविसीय आणि टी-20) मिळून तब्बल 564 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यामागोमाग इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याचा क्रमांक लागतो. अँडरसनने या दशकात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 535 विकेट्स मिळवल्या आहेत. अश्विन आणि अँडरसनमध्ये 29 विकेट्सचा फरक आहे. ही आकडेवारी अश्विनला तो एक प्रतिभाशाली गोलंदाज असल्याचे सिद्ध करते.
विशेष म्हणजे अश्विनने 9 जूलै 2017 नंतर भारतासाठी एकही एकदिवसीय तसेच टी-20 सामना खेळलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो केवळ कसोटी सामने खेळतोय. अश्विनने 30 जून रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तर 9 जूलै 2017 रोजी त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
1 जानेवारी 2010 ते आतापर्यंत अश्विन 70 कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 362 विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्या भारतीय गोलंदाजासाठी ही खूप सर्वात मोठी आकडेवारी आहे. तर अश्विनने याच कालावधीत 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्याने 150 विकेट्स मिळवल्या आहेत. या आकडेवारीनंतर भारताच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंच्या यादीत अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्यानंतर आता अश्विनचाच नंबर लागतो.
दशकात सर्वाधिक विकेट्स मिळवणारे गोलंदाज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -