2. गृहमंत्र्यांच्या खुर्चीवरुन राष्ट्रवादीत रस्सीखेच, सूत्रांची माहिती, अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील शर्यतीत
3. कर्जमाफीच्या धोरणात बदल करा, नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा
4. जनतेनं राज्य दिलं आहे, तर किमान मंत्रीमंडळाचा विस्तार तरी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला टोला
5. मी राष्ट्रवादीतच, पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवारांशी खलबतं केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या हर्षवर्धन पाटलांशी कानगोष्टी
6. हिंदुस्थानात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती हिंदू, सर्वांनी भारतमातेची पूजा करावी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य
7. वंचितला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का? एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांची टोलेबाजी
8. ब्रँडेड दारूच्या नावाखाली बनावट दारु विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबईतल्या छापेमारीत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, ईयर एंडच्या तोंडावर मोठी कारवाई
9. आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण, क्रिकेट सामन्यांच्या वेळेत बदल, शिर्डीसह अनेक मंदिरंही ग्रहणकाळात बंद राहणार
10. कोल्हापुरात मटण दुकानांवर छापा, मटण विक्रीचे निकष पाळले नसल्याचा दावा, अन्न आणि औषध विभागाची कारवाई