मुंबई: टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अभिनेत्री निमरत कौरसोबतच्या प्रेमाच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. त्या बातम्या चुकीच्या असल्याचं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. रवी शास्त्री आणि निमरत कौर मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. काल निमरत कौर आणि रवी शास्त्री यांनी या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं म्हणत रिलेशनशीपचे दावे फेटाळून लावले आहेत.

खरंतर या दोघांच्या वयामध्ये 20 वर्षांचं अंतर आहे. 2015 मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.

रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहे.

रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर निमरत कौर ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती. निमरत इरफान खानच्या 'लंच बॉक्स'मध्ये झळकली होती. याशिवाय तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारसोबत काम केलं होतं.

निमरतचं स्पष्टीकरण

निमरत कौरने एक ट्वीट केलं आहे, ज्यातून ती स्पष्टीकरण देत आहे. मात्र तिने स्पष्टपणे यात काहीही म्हटलेलं नाही. सत्यपरिस्थिती ही आहे, की मला रुट कॅनल करायचंय. बाकी तुम्ही ज्या बातम्या वाचत आहात, त्या तथ्यहीन आहेत. या तथ्यहीन गोष्टी तुम्हाला अनेकदा त्रास देतात, असं तिने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या 

रवी शास्त्रींसोबत अफेअरची चर्चा, अभिनेत्री निमरत कौर म्हणते...  

रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या अफेअरची चर्चा