मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला आहे. मॉर्गनने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची विक्रमी खेळी केली. आजच्या सामन्यात वन डे रॅन्किंगमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारा गोलंदाज रशीद खान यानेदेखील एक नकोसा विक्रम केला.


रशीद खानने आजच्या सामन्यात अवघ्या 9 षटकात 110 धावा दिल्या. विश्वचषक स्पर्धेच्या 44 वर्षांच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात महागडा स्पेल ठरला आहे. गेल्या वर्षी रशीद खानने आयसीसी वन डे रॅन्गिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सर्वात कमी वायाचा गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला होता. परंतु इंगलंडच्या फलंदाजांनी आज त्याच्या गोलंदाजीची पिसं काढली.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर 397 धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली. मॉर्गनने भारताचा सिक्सर किंग रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. त्या खेळीत त्याने 16 षटकार ठोकले होते.

वर्ल्डकपमधील महागडे गोलंदाज
रशीद खान - 9 षटकं - 110 धावा (विश्वचषक - 2019)
एम स्नेडन - 12 षटकं - 105 धावा (विश्वचषक - 1983 )
जेसन होल्डर - 10 षटकं - 104 धावा(विश्वचषक - 2015 )
दौलत जादरान - 10 षटकं - 101 धावा (विश्वचषक - 2015 )