एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यानंतर ओवेसी यांनी इशाऱ्याने आणखीन जोरात घोषणा देण्यातं आव्हान दिलं. काही वेळानंतर जेव्हा घोषणांचा आवाज कमी झाला असता ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली. शपथेचा शेवट करताना ओवेसी यांनी ‘जय भीम’, ‘जय मीन’, ‘तखबीर’, ‘अल्ला हू अकबर’, ‘जय हिंद’ म्हणत शपथेचा शेवट केला.
दरम्यान लोकसभेतील सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवर ओवेसी यांनी सडकून टीका केली. किमान मला बघून तरी सत्ताधाऱ्यांना ‘भारत माता की जय’ घोषणेची आठवण आली. तसेच सत्ताधाऱ्यांना संविधान आणि मुजफ्फरमधील चमकीच्या तापाने मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची आठवण असती तर अधिक चागंल झालं असत अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
Asaduddin Owaisi | असदुद्दीन ओवेसींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ | नवी दिल्ली | ABP Majha
लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली होती. भाजपाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीची महाआघाडी असतानाही प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांने निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही.
यापूर्वी भोपाळमधून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृतमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली आणि त्यावरचं विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये ‘मैं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी लोकसभा सदस्य के रूप में” अशी सुरुवात करत शपथ घेण्यास सुरुवात केली असता विरोधकांनी जोरदार विरोध करत त्यांना थांबवण्यास भाग पाडलं.