रांची: टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीसाठी रांचीचं मैदान हे लाभदायक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2013 साली विराटनं या मैदानात इंग्लंडविरुद्ध नाबाद 77 धावांची खेळी केली होती. मग 2014 साली त्यानं या मैदानात श्रीलंकेविरुद्ध सामन्यात नाबाद 139 धावा फटकावल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही विराट शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यानं मोहालीत 134 चेंडूंमध्ये नाबाद 154 धावा फटकावून भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळं चौथ्या वन डेतही विराट कोहलीवर भारतीय फलंदाजीची मदार राहिल. पण रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा या सलामीच्या जोडीचा निराशानजक फॉर्म, ही चौथ्या वन डेत भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
रोहित आणि रहाणेला पहिल्या तिन्ही वन डे सामन्यांमध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आलेली नाही.