ठाणे : ठाण्यात मनसेच्या महिला शहर अध्यक्षावर हल्ला झाला आहे. समीक्षा मार्कंडेय यांच्या डोक्यात दोघांनी धारदार शस्त्राने वार केले आहेत. पूर्ववैमनस्य किंवा निवडणुकीच्या वादातून मार्कंडेय यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समीक्षा यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. रात्री 7.30-8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ठाण्याच्या कोपरी परिसरात राहणाऱ्या समीक्षा घरगुती कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर वार केला. एका व्यक्तीच्या हातात लोखंडी रॉड असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.