राजकोट: ज्यो रूट, मोईल अली आणि बेन स्टोक्सच्या शतकी खेळींमुळं राजकोट कसोटीत इंग्लंडनं पहिल्या डावात 537 धावांची मजल मारली.
या सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रिद्धिमान साहानं बेन स्टोक्सला दोनदा जीवदान दिलं. त्यावेळी स्टोक्स अनुक्रमे 60 आणि 61 धावांवर खेळत होता.
स्टोक्सनं या संधीचा फायदा उचलून कसोटी कारकीर्दीतलं आपलं चौथं शतकं झळकावलं. बेन स्टोक्सनं 235 चेंडूंत तेरा चौकार आणि दोन षटकांराच्या मदतीनं 128 धावांची खेळी रचली.
त्याआधी मोईन अलीनं 213 चेंडूंत तेरा चौकारांच्या जोरावर 117 धावांची खेळी केली. भारताकडून रवींद्र जाडेजानं तीन, तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि आर. अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.