भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या नव्या नोटांच्या वैशिष्ठ्यांचा सहा महिन्यांआधीच अभ्यास सुरु केला होता. या नव्या नोटांच्या वैशिष्टयांची अद्याप स्पष्टपणे माहिती मिळालेली नसली तरी त्याची नक्कल करणं फार जिकीरीचं असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानच्या पेशावरमधून दरवर्षी अंदाजे 70 कोटींच्या नकली नोटा भारतात आणल्या जातात. याचाच वापर 'टेरर फंड' म्हणून केला जातो. दहशतवाद्यांना दिला जाणारा हा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये भारतीय चलनाच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करण्याचं तंत्र अवगत करण्यात आलं होतं. त्यामुळे या नोटा बाजारातून काढून टाकणं अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
संबंधित बातम्या