मुंबई: आयपीएलच्या पहिल्या आठ मोसमात चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करणारा सुरेश रैना यंदा नव्या जबाबदारीचं आव्हान पेलून मैदानात उतरणार आहे. आयपीएलमधल्या गुजरात लायन्स या नव्या टीमच्या कर्णधारपदाची धुरा रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.


 

सुरेश रैनाचा स्वभाव हा काही कोणताही वाद ओढवून घेण्याचा नाही. पण मुंबईतल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा प्रशिक्षक देशी असावा की परदेशी? या प्रश्नावर रैनानं विनोदबुद्धीनं प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्या पत्रकारालाच अडचणीत आणलं.

 

टीम इंडियाचा प्रशिक्षक देशी असावा की विदेशी? या प्रश्नावर सुरेश रैनानंही अतिशय तिरकस उत्तर दिलं. 'तुम्ही तुमच्या बायकोसोबत कम्फर्टेबल असाल की, दुसऱ्यासोबत?' अशा प्रकारचं उत्तर देत रैनानं या प्रश्नाला बगल दिली. मात्र, रैनानं विनोदी पद्धतीनं उत्तर देताना त्याचा दर्जा खालावला. त्यानंतर त्यानं स्वत:ला सावरण्याचा प्रयत्नही केला. 'कोच कोणता असावा किंवा असू नये हे बीसीसीआयचं काम आहे. आम्हाला जे कोच मिळतील त्यांच्यासोबत आम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे.' असं रैनानं उत्तर दिलं.

 

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कर्णधार धोनीनं विश्वचषकातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पत्रकाराची शाळा घेतली होती. तसाच काहीसा प्रयत्न काल सुरेश रैनांनही केला.

 



 

(रैना काय म्हणाला पाहा व्हिडिओच्या 05.17 ते 6.25 या टाइमलाइनवर)