विराट-अनुष्का वांद्र्यात दिसले, रेस्टॉरंटमध्ये डिनरही घेतलं!
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2016 04:56 AM (IST)
मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काल (बुधवार) रात्री मुंबईतील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिसून आला. सुत्रांच्या माहितीनुसार, दोघांनी एकत्र डिनरही घेतलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जेव्हा वांद्रेतील एका रेस्टॉरंटमध्ये जात असताना मीडियातील काही फोटोग्राफर आणि त्यांच्या चाहत्यानी त्यांचे काही फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. विराट आणि अनुष्का रेस्टॉरंटमध्ये जात असताना दोघांमध्ये चांगलाच ताळमेळ दिसून आल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. विराट कोहलीनं ग्रे टी-शर्ट परिधान केला होता. तर अनुष्का काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. एकीकडे विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच हे दोघं पुन्हा एकत्र दिसून आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तसं दोघांनीही ब्रेकअप बद्दल सार्वजनिकरित्या बोलणं टाळलंच आहे.