ट्रेंटब्रिज (इंग्लंड): इंग्लंडच्या मायकल लब आणि रिकी वेसल्स यांनी 'अ' श्रेणीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रेकॉर्ड ब्रेक भागीदारी रचण्याचा पराक्रम करीत द्रविड-गांगुलीचा तब्बल 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.


 

लब आणि वेसल्स यांनी नॉटिंगहॅमशाअर संघासाठी 39.2 षटकात तब्बल 342 धावांची भागीदारी केली. वेसल्सनं 97 चेंडूत 146 धावा केल्या. त्यानं आपल्या या खेळीत 14 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

 
लबनं 150 चेंडूत 184 धावा केल्या. त्यानं 21 चौकार आणि 6 षटकार ठोकले. लब आणि वेसल्स यांनी भारताच्या राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीचा विक्रम विक्रम मोडीत काढला. सौरभ आणि द्रविडनं 1999मध्ये विश्वचषकातील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 318 धावांची भागीदारी केली होती.

 



 

लब आणि वेसल्स यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर नॉटिंगहॅमशाअरनं 50 षटकात 8 गडी गमावत 445 धावांपर्यंत मजल मारली. 445 धावांचा पाठलाग करताना नॉर्थहॅम्पशाअरचा संघ 425 धावाच करु शकला. नॉर्थहॅम्पशाअरच्या रोरीनं 63 चेंडूत 128 धावा ठोकल्या. पण अखेर त्याची ही खेळी वाया गेली.

 
एकाच सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 870 धावा झाल्या. हा देखील एक विक्रम आहे. याआधी द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यात 872 धावा झाल्या होत्या. ज्यामध्ये आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला होता.