मुंबई : वनप्लसने व्हीआर हेडसेटच्या विक्रीमध्ये एक अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ‘वन प्लस 3’च्या लॉन्चिंगआधीच वन्प्लस कंपनीने अमेझॉनवर पाच सेकंदात 30 हजार व्हीआर हेडसेट्सची विक्री केली आहे.
या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी आधीपासूनच 10 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.
लूप व्हीआर हेडसेट्स अमेझॉन लूप व्हीआर पेजवर 3 जून ते 7 जूनदरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होतं. वनप्लस इंडियाचे महाप्रतिबंधक विकास अग्रवाल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, वनप्लस 3 च्या लॉन्चिंच्या तोंडावर लूप व्हीआर हेडसेट्सला अशाप्रकारे प्रतिसाद मिळाल्याने वनप्लस 3 बाबतही आशा वाढल्या आहेत.
वनप्लसने एएनटीव्हीआरच्या भागिदारीमध्ये लूप व्हीआर हेडसेट्सची निर्मिती केली असून, गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या कार्डबोर्ड अपडेट आहे. तर वनप्लस 3 ची अमेझॉनवर 15 जूनपासून विक्री सुरु होणार आहे.