बंगळूर : वर्ल्डकपच्या इतिहासात पर्दापणामध्येच सर्वात मोठा भीम पराक्रम करण्याचा मान न्यूझीलंडचा रायझिंग स्टार रचिन रवींद्रने केला आहे. त्याने आज 42 धावांची खेळी करताना वर्ल्डकपच्या इतिहासात पदार्पणामध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या खेळीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडित निघाला आहे.
सचिन तेंडुलकरने 1996 मध्ये वर्ल्डकपच्या पदार्पणामध्ये 523 धावांचा पाऊस पाडला होता. या धावांची रचिनने मागील सामन्यात बरोबरी केली होती. आजच्या सामन्यात त्याने 42 धावांची खेळी करतानाच सचिनला तर मागे टाकलंच, पण वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये आता तो प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत प्रथम स्थान पटकावलं आहे. यावरुन या खेळाडूची प्रतिभा लक्षात येते.
रचिन हा न्यूझीलंडसाठी या स्पर्धेत प्रतिभावान खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. त्याने नऊ सामन्यांमध्ये 565 धावा केल्या असून आहेत यामध्ये त्याने 52 चौकार तर 17 षटकार ठोकले आहेत. भारताविरुद्धही त्याने साखळी सामन्यात दमदार कामगिरी केली होती.
नावामागील रंजक कथा
रचिन रविंद्रचे आई-वडील क्रिकेटचे चाहते होते. त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड खूप आवडायचे. त्यामुळेच या दोन दिग्गज फलंदाजांची नावे एकत्र करून त्यांनी आपल्या मुलाचे नाव निर्माण केले. तर, रचिननेही आपले नाव सिद्ध केले आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडची झलक त्याच्या फलंदाजीतही दिसते.
इतर महत्वाच्या बातम्या