Ravichandran Ashwin on Hindi : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाने 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) गमावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तडकाफडकी अलविदा केला होता. अश्विनच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला. गाबा कसोटीनंतर अश्विन ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतला होता.


अश्विनच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ


आता रविचंद्रन अश्विन हिंदी भाषेवरून बोलल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. चेन्नईत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विन म्हणाला की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. अश्विनच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाषेच्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या भाषणादरम्यान अश्विनने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की कोणाला हिंदीत प्रश्न विचारण्यात रस आहे का, ज्यामध्ये कोणीही स्वारस्य दाखवले नाही. यानंतर अश्विन म्हणाला, 'मला वाटलं हे सांगावं. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे. आर. अश्विनच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अश्विनने अशा मुद्द्यांवर भाष्य करणे टाळावे, असा युक्तिवाद काही लोकांनी केला. एका यूजरने लिहिले की, 'अश्विनने असे बोलू नये. मला ते आवडत नाही. मी त्याचा चाहता आहे. तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकता तितक्या चांगल्या. आमच्या फोनवर कोणत्याही भाषेचे भाषांतर उपलब्ध आहे. काय अडचण आहे, भाषेचा मुद्दा लोकांवर सोडा.




दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, 'तुम्ही तामिळनाडूच्या बाहेर जाता आणि हिंदी येत नाही तेव्हा तुमचे आयुष्य किती कठीण असते, हे अश्विनने मुलाखतींमध्ये आधीच सांगितले आहे. हे आपण शिकू शकत नाही, जे भारतातील बहुतेक लोकांना माहित आहे?


अश्विनच्या वक्तव्यावरुन राजकारण सुरु


आर.अश्विनच्या वक्तव्याचे द्रमुकने समर्थन केले आहे. DAK नेते TKS Elangovan म्हणाले की, 'अनेक राज्ये वेगवेगळ्या भाषा बोलत असताना हिंदी ही अधिकृत भाषा कशी असू शकते?' मात्र, भाषेचा वाद पुन्हा सुरू करू नये, असे आवाहन भाजपने केले आहे. भाजप नेत्या उमा आनंदन म्हणाल्या, 'द्रमुकने त्याचे कौतुक करणे आश्चर्यकारक ठरणार नाही. मला त्यांना विचारायचे आहे की अश्विन हा राष्ट्रीय क्रिकेटपटू आहे की तामिळनाडूचा क्रिकेटपटू.


हिंदी अनिवार्य भाषा म्हणून लागू करण्यास विरोध 


1930-40 च्या दशकात तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी अनिवार्य भाषा म्हणून लागू करण्यास बराच विरोध झाला होता. द्रविड चळवळीचा उद्देश तमिळला चालना देणे आणि तमिळ भाषिकांच्या हक्कांवर दावा करणे हा होता. हिंदी भाषेचा निषेध करण्यात या आंदोलनाची मध्यवर्ती भूमिका होती. डीएमके, एआयएडीएमके सारखे द्रविडीयन राजकीय पक्ष हिंदीऐवजी तामिळ वापरण्याचा सल्ला देत आहेत. हिंदीचा प्रचार केल्यास तामिळसारख्या प्रादेशिक भाषांची स्थानिक ओळख कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.


हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की राजभाषा?


हिंदीला 14 सप्टेंबर 1949 रोजी अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला. यानंतर 1953 पासून राजभाषा संवर्धन समितीतर्फे दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनाचे आयोजन करण्यात येऊ लागले. विविधतेमुळे, भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही, परंतु सरकारी कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी भाषिक आधार तयार करण्यासाठी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. यासंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदी संविधानाच्या भाग 17 मध्येही करण्यात आल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 च्या कलम 343(1) मध्ये राष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी असेल आणि लिपी देवनागरी असेल.


इतर महत्वाच्या बातम्या