मुंबई: रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या अष्टपैलू शिलेदारांना इंग्लंडविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीनं घेतला आहे.


एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

अश्विन आणि जाडेजा यांच्याऐवजी लेग स्पिनर अमित मिश्रा आणि ऑफ स्पिनर परवेझ रसूल यांचा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि इंग्लंड संघांमधले तीन ट्वेन्टी20 सामने अनुक्रमे 26 जानेवारी, 29 जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येतील.

संबंधित बातम्या
केदार जाधवने 'ती' खंत बोलून दाखवली!

टीम इंडियाचा 'वाघ' केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित

गर्लफ्रेंडचे फोटो नेटवर, बांगलादेशी क्रिकेटर अटकेत