नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे सर्व मंत्री गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व मंत्री दोन्ही राज्यात प्रचारात व्यस्त असून राजधानी दिल्लीची जबाबदारी सध्या केवळ एका मंत्र्याच्या खांद्यावर आहे.


केजरीवाल स्वतः गोव्यात तळ ठोकून आहेत. तर त्यांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना पंजाबची जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयाही पंजाबमध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीत सध्या फक्त पर्यावरण मंत्री इम्रान हुसैन उपस्थित आहेत.

पंजाब आणि गोव्यात 4 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तोपर्यंत राजधानी दिल्लीत अशीच परिस्थिती राण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामुळे कामकाजावर काहीही फरक पडणार नसल्याचा दावा 'आप'ने केला आहे.