वॉशिंग्टन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकेतील ट्रम्पविरोधी मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चातील महिलांचा अभिमान असून या मोर्चात आपल्याला सहभागी न होता आल्याबद्दल तिने खंतही व्यक्त केली आहे.


अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महिलाविरोधी निती असल्याचा आरोप करत लाखोंच्या संख्येने अमेरिकन महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या मोर्चाला प्रियांकानेही पाठिंबा दर्शवला आहे.

प्रियांका सध्या तिचा हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'च्या शुटिंगसाठी लॉस एंजेलिसमध्ये आहे. या सिनेमात ड्वेन जॉन्सन, जॅक अफ्रॉन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातमी : शपथविधी संपन्न, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष