Quinton de Kock Record: क्विंटन डी कॉकने अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या  यष्टिरक्षकाने विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात स्पर्धेतील एका सामन्यात एकूण 6 झेल घेत इतिहास रचला. डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक ठरला. त्याने आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाउचरला मागे टाकले.






डी कॉकच्या आधी, मार्क बाउचर आणि मॉर्न व्हॅन विक यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक 4 झेल घेतले होते, पण आता हा विक्रम डी कॉकच्या नावावर झाला आहे. डी कॉकने अफगाणिस्तानविरुद्ध इब्राहिम झद्रान, कर्णधार शाहिदी, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान आणि नूर अहमद यांचे झेल घेतले.


यासह डी कॉकने विश्वचषकातील एका सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाज बाद करण्याच्या बाबतीत माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट आणि पाकिस्तानी यष्टीरक्षक सर्फराज अहमद यांची बरोबरी केली.


विश्वचषक सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट्स...



  • 6- अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध नामिबिया, पॉचेफस्ट्रूम, 2003

  • 6- सर्फराज अहमद (पाकिस्तान) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑकलंड, 2015

  • 6- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध अफगाणिस्तान, अहमदाबाद, 2023*. (आज)


विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी



  • 21 – अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2003)

  • 21– टॉम लॅथम (विश्वचषक २०१९)

  • 20 – अॅलेक्स केरी (वर्ल्ड कप 2019)

  • 19 – क्विंटन डी कॉक (वर्ल्ड कप 2023)*

  • 17– कुमार संगकारा (वर्ल्ड कप 2003)

  • 17 – अॅडम गिलख्रिस्ट (वर्ल्ड कप 2007).






डिकाॅकच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा 


डिकाॅकने फलंदाजीतही धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने आतापर्यंत चार शतके झळकावत 591 धावांचा पाऊस पाडला आहे. आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 41 धावांची खेळी न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रला मागे टाकले. वर्ल्डकपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम आतापर्यंत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  2003 मध्ये 673 धावांचा विक्रम केला होता. तो आजवर अबाधित असला, तरी यंदा क्विंटन डी कॉक तोडण्याची शक्यता आहे. त्याने सेमीफायनलला 83 धावांची खेळी केल्यास तो 48 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा पराक्रम असेल. एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये मॅथ्यू हेडन (659 -2007), रोहित शर्मा (648-2019) डेव्हिड वाॅर्नर (647-2019) आणि शाकीब उल हसन (606-2019) यांचा समावेश आहे. त्यानंतर क्विंटन डी कॉकचा नंबर असल्याने पुढील सामन्यात मोठी खेळी केल्यास हा पराक्रम त्याच्या नावावर होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या