हैदराबाद: रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या पी. व्ही. सिंधूनं भारतात परताच पुन्हा आपल्या सरावाला सुरूवात केली आहे.

 

सोमवारीच सिंधू रिओवरून भारतात परतली. त्यानंतर तिची हैदराबादेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या दैदिप्यमान यशानं सिंधू हुरळून गेली नाही. अवघ्या दोनच दिवसात सिंधू पुन्हा तयारीला लागली आहे. 2020 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीनं ती बॅडमिंटन कोर्टवर सराव करते आहे.

 

मायदेशी परताच अवघ्या काही दिवसात सिंधूनं पुन्हा एकदा प्रशिक्षक गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला आहे. दरम्यान पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत वर्ल्ड नंबर वन  कॅरोलिना मरिनशी मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे.

 

संबंधित बातम्या :


बिर्याणी खायची आहे, रुस्तम पाहायचाय, पीव्ही सिंधूची इच्छा


तीन महिने माझ्याकडे मोबाइल नव्हता: सिंधू


पदक मिळेल असा विचारही केला नव्हता- पीव्ही सिंधू


आई माझा सिंधूसोबत फोटो आहे: सलमान खान


चॅम्पियन प्लेयर ते चॅम्पियन प्रशिक्षक : पुलेला गोपीचंद


सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या यशाची कहाणी