हेडलाईन्स


----------------------

1 राज्यासह देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह, मथुरा, द्वारकेसह मुंबईतील इस्कॉन मंदिर कृष्णाच्या जन्मासाठी सजले

---------------------

2 दहीहंडी ऑलिम्पिक खेळ नाही, त्यामुळे सण नियमानुसारच होणार, सुप्रीम कोर्टानं जयजवानची याचिका फेटाळली, 20 फुटापेक्षा उंच हंडी नाहीच

---------------------

3 'हिंदूंचे सण हिंदूंनी हिंदुस्थानात साजरे करणं म्हणजे अपराध', सरकारनं दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधांवर सेनेची सामनातून बोचरी टीका,

-------------

4 महात्मा गांधींच्या हत्येला संघ जबाबदार असल्याचं वक्तव्य केलंच नव्हतं, राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टात यू टर्न, प्रकरण मिटवण्याचे संघाचे संकेत

-------------

5 सिंगल पेरेंट आणि होमोसेक्शुअल्सना सरोगसीचा अधिकार नाही, सुषमा स्वराज यांची माहिती, तर वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना मात्र मातृत्वाचा अधिकार

--------------

6 भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणाऱ्या स्कॉर्पिन पाणबुडीची गोपनीय कागदपत्रं लीक, संरक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, नौदलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

-------------

7 सुरक्षेच्या नावाखाली राज्य सरकारची अतिशयोक्ती, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक, नव्या मसुद्यावर सर्व स्तरातून नाराजी

-------------

8 नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा,  हवेत तलवारी फिरवून कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा प्रश्न ऐरणीवर

----------

9 कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग  3 चं काम ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व कंत्राटदारांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या

--------------

10 इटलीतील अमाट्रिस शहर भूकंपानं हादरलं, आतापर्यंत 159 नागरिकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

--------------

एबीपी माझा वेब टीम