Malaysia Open 2022: पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणॉय (HS prannoy) यांनी मलेशिया ओपनच्या (Malaysia Open 2022) उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं थायलंडची प्रतिस्पर्धी फिट्टायापोर्न चायवानचा (phittayaporn chaiwan) पराभव करत पुनरागमन केलं. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं गुरुवारी क्वालालंपूर येथे 57 मिनिटांच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फिट्टायापोर्न चायवानचा 19-21, 21-9, 21-14 असा पराभव केलाय.
ट्वीट-
एचएस प्रणॉयकडून मोठी अपेक्षाभारताची स्टार बॅडमिंटनपटू तिच्या पुढच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चिनी तैपेईच्या ताई त्झू यिंगशी भिडणार आहे. जागतिक क्रमवारीत 21व्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉयनंही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. थॉमस कपमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजेतेपदाच्या नायकांपैकी एक असलेल्या प्रणॉयची पुढील लढत इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे.
पहिल्या फेरीत पोर्नपावी चोचुवाँगवर विजयमलेशिया ओपनच्या पहिल्या फेरती पीव्ही सिंधू आणि थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँग यांच्यात स्पर्धा होती. पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकला. सिंधूनं पहिल्या सेटमध्ये पोर्नपावीचा सहज पराभव केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने पलटवार करताना कडवे आव्हान दिले, मात्र पॉर्नपावीला दुसरा सेट जिंकण्यात यश आलं नाही. सिंधूनं दुसरा सेट 21-17 नं असा जिंकला.अशाप्रकारे पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
हे देखील वाचा-