Share Market Updates : भारतीय शेअर बाजारात  सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. जागतिक शेअर बाजारात असलेली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे बाजारात घसरण असल्याचे चित्र होते. मात्र, काही वेळेनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. 


आज शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांक 129.81 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 52,897  अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 24.60 टक्क्यांच्या घसरणीसह सुरू झाला. निफ्टी 15,774  अंकांवर खुला झाला. घसरणीनंतर काही वेळेतच शेअर बाजार वधारला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 281 अंकांनी वधारून 53,307 अंकावर वधारत होते. निफ्टी 72 अंकांनी वधारत 15,872.60 अंकावर व्यवहार करत होता. 


आज निफ्टी 50 मधील 36 शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. तर, 14 शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच बँक निफ्टीत तेजी दिसून आली. बँक निफ्टीमध्ये 175.75 अंकांच्या तेजीसह 33445 या पातळीवर व्यवहार करत आहेत. 


एफएमसीजी आणि रियल्टीमधील शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. मीडिया शेअर्समध्ये 0.76 टक्के आणि ऑइल अॅण्ड गॅस शेअर दरात 0.72 टक्क्यांनी वधारला आहे.  बँकिग क्षेत्रातील शेअर 0.58 टक्के आणि आयटी शेअरमध्ये 0.45 टक्क्यांनी वधारला आहे.


बुधवारी  बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 134 अंकांची घसरण, निफ्टीमध्ये 32 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,026 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,799 अंकांवर स्थिरावला.मेटल, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस, उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बँकिंग, आयटी, एमएमसीजी या क्षेत्रातल्या शेर्असमध्ये घसरण झाली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: