Syed Modi International Tournament 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलंय.  माजी विश्वविजेत्या सिंधूनं रविवारी (23 जानेवारी) अंतिम फेरीत मालविका बनसोडचा 21-13 आणि 21-16 असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय. पीव्ही सिंधुच्या या कामगिरीमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. 


सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधु आणि रशियन खेळाडू इव्हगेनिया कोसेत्स्कायाला यांच्यात लढत होती. मात्र, इव्हगेनिया कोसेत्स्कायाला दुखापत झाल्यानं पीव्ही सिंधुला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. उपांत्य फेरीत पीव्ही सिंधुनं 21-11 असा विजय मिळवला. त्यानंतर दुखापतीमुळं कोसेत्स्कायानं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.


ट्वीट-



पीव्ही सिंधुला नेताजी पुरस्कारानं सन्मानित
हैदराबादमधील बिर्ला तारांगण येथे आज सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ एनजीओ जन ऊर्जा मंचनं आयोजित केलेल्या ‘उद्घोष’ कार्यक्रमात जागतिक किर्तीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू , आर्चरी गर्ल (तिरंदाज) डॉली शिवानी, एनआयएमएसचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांना ‘नेताजी’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पी. व्ही. सिंधुला दिला जाणारा युवा रत्न पुरस्कार तिचे वडील रमणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


इन्स्टिट्यूट ऑफ एन्शियंट इंडियन फिलॉसॉफीचे संस्थापक आणि जागतिक ख्यातीचे गणितज्ञ श्रीनिवास रामानुज यांचे नातू प्रा. राजम यांना हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि त्रिदंडी चिन्ना जेयार स्वामी यांच्या हस्ते ‘नेताजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha