रिओ दी जनैरो : देशाच्या आणखी एका लेकीने भारताची झोळी पदकाने भरली आहे. पैलवान साक्षी मलिकपाठोपाठ आता बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे.


 

पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूच्या या कामगिरीमुळे या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक सुवर्ण किंवा एक रौप्यपदक जमा होणार हे निश्चित झालं आहे.

 

उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या या विजयासह भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं.

 

महिला एकेरीच्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला स्पेनच्या कॅरोलिना मरिनशी होईल.