प्रो कबड्डी उपांत्य फेरीत पुणेरी पलटणची पटना पायरेट्सशी टक्कर
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 06:13 PM (IST)
मुंबई : मनजीत चिल्लरच्या पुणेरी पलटणला प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीत पटना पायरेट्सचा मुकाबला करायचा आहे. हैदराबादच्या गचिबावली स्टेडियममध्ये उद्या रात्री आठ वाजत्या या लढतीला सुरुवात होईल. प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमत साखळी फेरीमध्ये पटना पायरेट्सनी 52 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. तर पुण्याच्या टीमनं 42 गुणांसह चौथं स्थान मिळवलं होतं. पुणे आणि पटनामधला हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या उपांत्य लढतीत तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स आमनेसामने येतील. साखळी फेरीत तेलुगू टायटन्स 50 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या तर जयपूरची टीम 47 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती.