अनधिकृत बांधकामांना संरक्षण, राज्य सरकारचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 05:54 PM (IST)
मुंबईः दिघावासियांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत बांधकाम नियमित करायचं असेल तर त्यासंदर्भात 31 जूलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना सरकारानं हा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकार हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे बेघर होण्याची टांगती तलवार असणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.