Pro Kabaddi League 2022: भारतात अल्पकाळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या नवव्या हंगामाला (Pro Kabaddi League Season 9) येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या हंगामात प्रेक्षकांनाही सामना पाहण्यासाठी मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं याबाबात घोषणा केलीय. या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 5, 6 ऑगस्ट 2022 ला पार पडली होती.
प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती.परंतु, नवव्या हंगामात प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात जाऊन प्रो कबड्डी लीगचे सामने पाहता येणार आहेत. कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यानं आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. महत्वाचे म्हणजे, येत्या डिसेंबरपर्यंत प्रो कबड्डीचे सामने रंगणार आहेत. हे सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद खेळवले जाणार आहेत.
आठव्या सत्रात दिल्लीनं मारली बाजी
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दंबग दिल्ली केसीनं बाजी मारली. या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघानं तीन वेळा विजेता ठरलेल्या पटना पायरेट्सचा एक गुणानं पराभव केला. या हंगामात दिल्लीनं पटनावर 37-36 विजय मिळवला होता. फक्त एका अंकानं दिल्लीनं प्रो कबड्डीचा खिताब जिंकला होता. या विजयासह प्रो कबड्डीचा खिताब जिंकणारा दिल्ली सहावा संघ ठरला.
कुधी कुठे पाहणार सामना?
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात किती संघ भाग घेतील?
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात एकूण 12 संघ स्पर्धा सहभाग घेतील.
प्रो कबड्डीचा गतविजेता कोण?
दबंग दिल्ली केसी हे प्रो कबड्डीचे गतविजेते आहेत.
प्रो कबड्डीचा लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
प्रो कबड्डीचा नववा हंगामाचं स्टारस्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. डिस्ने+हॉटस्टार वर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल.
हे देखील वाचा-