Badminton World Championship 2022: बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) चिराग शेट्टीनं (Chirag Shetty) इतिहास रचलाय. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीनं जपानच्या ताकुरो होकी (Takuro Hoki) आणि युगो कोबायाशी (Yugo Kobayashi) यांचा 24-22, 15-21, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिलीय. तसेच बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारून देशासाठी पदक निश्चित करणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरलीय. 


या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये भारतीय पुरूष दुहेरी जोडीनं 24-22 असा विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारताचा 21-15 असा पराभव करत जपाननं सामन्यात पुनरागमन केलं. त्यानंतर निर्णायक आणि तिसऱ्या सेटमध्ये सात्विकसाईराज रँकीरेड्डी- चिराग शेट्टी जोडीनं आक्रमक खेळी केली. या सेटमध्ये भारतानं जपानचा 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या जोडीनं 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलंय.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे एकूण 13वं पदक आहे. त्याचबरोबर दुहेरीच्या सामन्यात भारताला याआधी एक पदक जिंकलंय. 


ट्वीट-



सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी दमदार कामगिरी
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं प्रथमच उपांत्य फेरी गाठून जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक निश्चित केलं. जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे हे दुसरं पदक असेल. यापूर्वी, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं 2011 मध्ये महिला दुहेरीत पदक जिंकलं होतं.


एमआर अर्जुन- ध्रुव कपिला जोडीचं आव्हान संपुष्टात
एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांची विजयी मोहीम संपुष्टात आली. रुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा सुवर्णपदक विजेता जोडी मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेटियावान यांनी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचा पराभव केला. 


हे देखील वाचा-