प्रो कबड्डीच्या फायनलमध्ये पटना विरुद्ध जयपूर सामना
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 04:52 PM (IST)
हैदराबाद : गतविजेत्या पटना पायरेट्सनं सलग दुसऱ्या वर्षी प्रो कबड्डी लीगच्या फायलनमध्ये धडक मारली आहे. हैदराबादच्या गचिबावली स्टेडियममध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात पटना पायरेट्सनं मनजित चिल्लरच्या पुणेरी पलटणवर 37-33 अशी चार गुणांनी मात केली. या सामन्यात अगदी 36 व्या मिनिटापर्यंत पुणेरी पलटणकडे 29-27 अशी दोन गुणांची आघाडी होती. पण त्यानंतर प्रदीप नरवालनं जबरदस्त चढाया करुन तेलुगू टायटन्सला विजय मिळवून दिला. प्रदीप नरवालनं चढाईत आठ आणि पकडीत दोन अशी एकूण दहा गुणांची कमाई केली. तर राजेश मोंडलनंही सहा गुणांची वसूली करुन पटना पायरेट्सच्या विजयाला हातभार लावला. पुणेरी पलटणसाठी दीपक हुडानं नऊ आणि मनजित चिल्लरनं सात गुणांची कमाई केली.