Pro Kabaddi League 2019 : आज यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटनमध्ये सामना, पाहा दोन्ही संघांची स्थिती
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2019 05:33 PM (IST)
प्रो कबड्डी लीगमध्ये आज दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला सामना यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.
मुंबई : प्रो कबड्डी लीगमध्ये आज दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स आणि बंगाल वॉरियर्समध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना रात्री 8.30 वाजता सुरु होईल. सध्या यू मुंबा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ दोन सामने खेळला आहे. त्यापैकी एक सामना जिंकला आहे. तर दुसरा सामना गमावला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या पाच गुण जमा झाले आहेत. पुणेरी पलटनने अद्याप गुणतालिकेत खातं उघडलेलं नाही. पुण्याचा संघ केवळ एकच सामना खेळला आहे. तो सामना त्यांनी गमावला आहे. शुन्य गुणांसह पुण्याचा संघ गुणतालिकेत अकराव्या स्थानावर आहे. आज दुसरा सामना जयपूर आणि बंगालच्या संघात खेळवला जाणार आहे. जयपूरचा संघ एक सामना जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर बंगालच्या संघानेदेखील एक सामना जिंकला आहे. गुणतालिकेत हा संघ पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 5 गुण आहेत.