दुसऱ्या बाजूला आजच्या सामन्यात पराभतू झालेल्या यू मुंबाला केवळ एक गुण मिळाला. यू मुंबाच्या खात्यात आता 11 गुण जमा झाले आहेत. 11 गुणांसह यू मुंबा गुणतालिकेत सातव्या स्थानावर फेकली गेली आहे.
सामन्याच्या पहिल्या सत्रात बेंगलुरु बुल्स संघ यू मुंबापेक्षा 13-11 ने पुढे होता. पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडे विरुद्ध संघाला ऑल आऊट करण्याची संधी होती. परंतु दोन्ही संघांच्या दमदार खेळांडूनी आपल्या संघांना ऑल आऊट होण्यापासून वाचवलं.
दोन्ही संघांचे रेडर्स (चढाई करणारे) तुल्यबळ होते. दोन्ही संघांच्या रेडर्सनी प्रत्येकी 15 पॉईंट्स कमावले. तर टॅकल (बचाव)पॉईंट्स मिळवण्यात मुंबाचे खेळाडू थोडे कमी पडले. बेंगलुरु बुल्सने 8 टॅकल पॉईंट्स कमावले तर मुंबाच्या खेळाडूंना केवळ 4 टॅकल पॉईंट्स कमावता आले.
बेंगलुरु बुल्सकडून पवन कुमारने सर्वाधिक 11 रेड पॉईंट्स कमावले. तर यू मुंबाच्या अर्जुन देशवालने सर्वाधिक 6 रेड पॉईंट्स मिळवले, अभिषेक सिंहने 5 रेड पॉईंट्स कमावले.