मुंबई : कोल्हापूरचा सिद्धार्थ देसाई यंदाच्या प्रो कबड्डी लीगमधला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या सातव्या मोसमासाठी तेलगू टायटन्सने सिद्धार्थला 1 कोटी 45 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं.
मुंबईत सुरु असलेल्या या लिलावाच्या पहिल्या दिवशी सिद्धार्थसाठी 30 लाखांपासून बोलीला सुरुवात झाली. पण तेलगू टायटन्सने सिद्धार्थसाठी थेट एक कोटींची बोली लावली. त्यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्समध्ये चढाओढ रंगली होती. पण अखेरीस टायटन्सने बाजी मारली.
गेल्या मोसमात यू मुंबाकडून खेळणाऱ्या सिद्धार्थने सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळवला होता. पण यावर्षी यू मुंबाने सिद्धार्थसाठी बोली लावण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
सिद्धार्थ देसाईच्या खालोखाल नितीन तोमरला बोली लागली. पुणेरी पलटन संघाने त्याला 1 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात कायम ठेवलं. सातव्या मोसमाच्या लिलावात हे दोन खेळाडू कोट्यधीश ठरले.
तर मागील सलग सहा मोसमात तेलुगू टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या राहुल चौधरीला यंदा रिटेन केलेलं नाही. राहुल चौधरी 94 लाख रुपयांसह प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमासाठी तामिळ थलायवाजमध्ये सामील झाला आहे.
प्रो कबड्डी लीग 2019 लिलाव : कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईला सर्वात मोठी बोली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2019 09:22 PM (IST)
गेल्या मोसमात यू मुंबाकडून खेळणाऱ्या सिद्धार्थने सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळवला होता. पण यावर्षी यू मुंबाने सिद्धार्थसाठी बोली लावण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -