PKL 9 Points Table: प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi 2022) नवव्या हंगामात शनिवारी तीन सामने पाहायला मिळाले. तिन्ही सामने रोमांचक आणि मनोरंजक ठरले. पहिला सामना बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बेंगळुरूनं 15 गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करत या हंगामातील चौथा विजय मिळवला. बंगळुरूसाठी भरतनं चमकदार कामगिरी केली. त्यानं या हंगामातील तिसरा सुपर 10 लगावला.


दिवसाचा दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात पुन्हा एकदा तेलुगू टायटन्स संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जयपूरनं हा सामना मोठ्या फरकानं जिंकला आणि या हंगामातील सलग पाचवा विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात  गुजरात जायंट्सनं हरियाणा स्टीलर्सला पराभवाची धुळ चारली. हा हरियाणाचा सलग चौथा पराभव ठरला.


ट्वीट-






 


प्रो कबड्डी लीग 2022 गुणतालिका
जयपूर सहा सामन्यांत पाच विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीनंही पाच सामने जिंकले आहेत, पण आता जयपूरचा रनरेट दिल्लीपेक्षा चांगला आहे. बेंगळुरू तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, टायटन्सचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.


ट्वीट-




 


प्रो कबड्डी लीग 2022 खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी
शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात 18 रेड पॉइंट घेणाऱ्या गुजरातच्या राकेशला सहा सामन्यात 78 रेड पॉइंट मिळाले आहेत. तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च रेड पॉइंट खेळाडू आहे. दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार सहा सामन्यांत 81 रेड गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. या हंगामात सलग सहा सुपर 10 मारणारा नवीन हा एकमेव खेळाडू आहे. डिफेंडर्सच्या यादीत बंगालचा गिरीश एर्नाक सातत्यानं पहिल्या स्थानावर आहे. गिरीशनं 6 सामन्यात 23 टॅकल पॉइंट घेतले आहेत.


हे देखील वाचा-