खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा सर्रास वापर करण्यात येतो. इंदूरमधल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या कालावधीत झालेल्या उत्तेजक चाचणीत पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटॅलिनचे अंश सापडले होते.
वर्ल्ड अँटी डोपिंग असोसिएशनच्या नियमानुसार स्पर्धेच्या कालावधीत किंवा स्पर्धा नसतानाही टर्ब्युटॅलिनचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यामुळे 16 मार्च ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वी शॉने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. हा पदार्थ खोकल्याच्या औषधामध्ये आढळतो. त्याने या पदार्थाचे सेवन केल्याने त्याच्याकडून डोपिंग नियमांचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या या कारवाईमुळे पृथ्वी शॉ बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांना मुकणार आहे.
व्हिडीओ पाहा