विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने चॅलेंज स्वीकारुन ते पूर्णही केलं. आवडीचा व्यायाम करुन तिने फिटनेस चॅलेंजचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर तिने अभिनेता वरुण धवन आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलला चॅलेंज दिलं.
तर पंतप्रधान नरेंद्र मोंदींनीही विराटचं आव्हान स्वीकारलं. लवकरच व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
त्याआधी राज्यवर्धन राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी 'हम फिट तो इंडिया फिट' ह्या हॅशटॅगने मोहीम सुरु केली आहे. राठोड यांनी आपल्या कार्यालयातच पुश अप्स मारुन हृतिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवाल यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं.
त्यानंतर हृतिक रोशन, सायना नेहवाल, बबिता कुमारी यांच्यासह अनेक राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटीज राठोड यांच्या या मोहीमेत सहभाग नोंदवत आहेत.
संबंधित बातम्या
राज्यवर्धन सिंह राठोड यांचं सायना, विराट, हृतिकला चॅलेंज
मोदीजी, कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं, आता माझंही स्वीकारा : राहुल गांधी