क्रीडा दिनानिमित्त विविध खेळाडूंचा आज पुरस्काराने गौरव!
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 03:03 AM (IST)
नवी दिल्लीः हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. भारतीय हॉकी संघाला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवण्यात महत्वाचा वाटा असलेल्या ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. गेले वर्षभर आणि ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आजच्या दिवशी विविध पुरस्कारांनी गौरव केला जाणार आहे.