Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील (PKL 9) 31व्या सामन्यात पुणेरी पटलननं (Puneri Paltan) बंगाल वॉरियर्सचा (Bengal Warriors) पराभव करून सलग तिसरा विजय मिळवलाय. दमदार डिफेंसच्या जोरावर पुण्यानं बंगालचा 27-25 फरकानं पराभव केला. बंगालचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात फजल अत्राचलीची (Fazel Atrachali) जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली.
ट्वीट-
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज
पहिला हाफमध्ये दोन्ही संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. हाफ टाईमपर्यंत सामना बंगालच्या बाजून झुकलेला दिसत होता. पहिल्या हाफमध्ये बंगालचा कर्णधार मनिंदर सिंहनं सुपर रेड टाकताना सर्वाधिक पाच रेड पॉइंट घेतले. पलटननं मनिंदरला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बाकावर बसवलं. अन्यथा त्याचे गुण जास्त असू शकले असते. पलटनसाठी मोहित गोयतनं रेडमध्ये सर्वाधिक तीन पॉईंट्स मिळवले. कर्णधार फजल अत्राचली पहिल्या हाफमध्ये फार काही करू शकला नाही. बंगालसाठी गिरीश एरनाकनं तीन टॅकल पॉइंट घेत आपला फॉर्म कायम ठेवला. चार रेड टाकूनही दीपक हुडाला खातं उघडता आलं नाही.
दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पटलनची खास कामगिरी
दुसऱ्या हाफमध्ये खेळ अगदी जवळ आला होता, ज्यामध्ये दोन्ही संघांनी स्वत:ला सुरक्षित ठेवले. अर्ध्या तासाचा कालावधी संपल्यानंतर बंगाल एका पॉईंटनं पुढं होता. सोंबीरनं एकाकी झुंज देत चार प्रयत्नांत पाच टॅकल पॉइंट घेतले. या हंगामात हाय फाईव्ह मारणारा सोंबीर हा पलटणचा पहिला डिफेंडर ठरला आहे. बंगाल 33व्या मिनिटाला ऑलआऊट झाला आणि पलटननं सामन्यात चार गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये फजलनं पुनरागमन केलं. त्यानंही आपले हाय फाईव्ह पूर्ण केलं. फजलने सामन्यात सर्वाधिक सहा टॅकल पॉइंट घेतले. डिफेंडर्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणेरी पटलननं सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय.
हे देखील वाचा-