भारताची थट्टा करणाऱ्या ब्रिटिश पत्रकाराचं विरुला आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 07:08 AM (IST)
नवी दिल्लीः भारताला पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत इंग्लंड वर्ल्ड कप जिंकलेला असेल, असं आव्हान ब्रिटिश पत्रकाराने भाराताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला दिलं आहे. भारत रिओ ऑलिम्पिकमधील दोनच पदकांवर सेलिब्रेशन करत आहे, म्हणणाऱ्या ब्रिटिश पत्रकाराला विरुने सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोघांत पुन्हा ट्विटर वॉर सुरु झाला आहे. इंग्लंडने काल पाकिस्तानविरुद्ध 444 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पिअर्स मॉर्गनने हे आव्हान दिलं. भारताला पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत इंग्लंड वर्ल्ड कप जिंकलेला असेल, यावर 10 लाखांची पैज लावतो का, अशा शब्दात मॉर्गनने आव्हान दिलं.