याप्रकरणी परीक्षार्थी संदीप घोनवालसह 5 जणांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. डिव्हाईस, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिकारी डॉ. विकास राठोड यांनी याप्रकरणाची तक्रार नोंदवली होती, अशी माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
डमी परीक्षार्थी म्हणजेच क्लर्क मदन बामनाथ हा मुलीच्या प्रोजेक्टसाठी म्हणून राठोड यांचा लॅपटॉप घेऊन गेला. मात्र दोन दिवसांनी लॅपटॉप परत आणला तेव्हा त्यामध्ये काही प्रश्नपत्रिकांचे फोटो आढळले. त्यानंतर राठोड यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, असं राठोड यांनी सांगितलं.
पोलिसांनी तातडीने मदन बामनाथ, त्याचा मेहूना संदीप आणि लखन यांनाही अटक केली. या तिघांनी मिळून वर्धा येथे एमपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थीचा पेपर औरंगाबादेतून सोडवला. परीक्षा केंद्रावरुन ब्लूटूथद्वारे प्रश्न औरंगाबादमध्ये सांगण्यात आले. तर त्याचे फोटोही पाठवण्यात आले, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली.