नवी दिल्ली: सर्व मुस्लिमांनी दहशतवादी बनण्याचा सल्ला देणारा वादग्रस्त मुस्लीम धर्म प्रसारक झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ झाली आहे. झाकीर नाईकवर दहशतवाद प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असा सल्ला देशाच्या सॉलिसिटर जनरल यांनी गृह मंत्रालयाला दिला आहे.

 

मुंबईच्या डॉक्टर झाकीर नाईकच्या भाषणांचे व्हिडीओ तपासणीसाठी सॉलिसिटर जनरल यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामध्ये तो दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे चोहोबाजूंनी नाकेबंदी झाल्याने परदेशात पळून गेलेला.

 

झाकीर नाईक त्याच्या पीस टीव्हीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे दहशतवादाला प्रोत्साहन देत होता. बांग्लादेशातील ढाक्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांनी झाकीर नाईकचा चेहरा उघडा पाडला.

 

दरम्यान, देशाचे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी झाकीर नाईकच्या भाषणांची तपासणी करून गृहमंत्रालयाला अहवाल दिला. यात त्यांनी झाकीर नाईववर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाला दिल्या आहेत.